नेहमी आनंदी जीवन जगा ....


3. आनंदी जीवन कसे जगावे ....प्रा.प्रवीण गायकर ..



   
                 

                         आपण जीवन जगत असताना ,आपल्या जीवनात दररोज काही ना काही समस्या , अडचणी येत असतात त्या मुळे आपण आपल्या जीवनाला कंटाळलेलो असतो .. आणि बोलत असतो आपलं नशीबच चांगलं नाही वैगरे ...... आपली जगण्याची इच्छा निघून जाते , मग बऱ्याच वेळेस आपण या जीवनाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करत असतो , पण जेव्हा आपण आत्महत्या करतो त्यावेळेस आपण हा विचार करत नाही की आपण गेल्यावर आपल्यावर जे प्रेम करत असतील( आई , वडील , भाऊ , बहीण ) त्यांचं काय होईल या सर्व गोष्टींचा आपण विचार करत नाही .... 
                            पण असा विचार न करता आपण आनंदी जीवन कसं जगलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे .... यावेळी सरांनी काही आनंदी जीवन जगण्याचे सूत्रं सांगितली ती पुढील प्रमाणे :
1. जीवन जगत असताना आलेल्या अडचणीला सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवणे ..
2 . कोणाबद्दल मनात राग ठेवू नये , ज्यांच्यावर राग आहे त्या सर्वांना मनापासून क्षमा करावी.
3. दररोज सकाळी उठल्यावर ध्यान धारणा करावी..
4. सकाळी उठल्यावर सकारात्मक गोष्टींचा विचार करावा ..
5. सकाळची सुरवात चांगल्या कामाने करावी..
6. नेहमी आनंद राहण्याचा प्रयत्न करावा .
    या वेळी एक कविता आठवते ...
   जीवनात एक क्षण रडवून जाईल 
   तर दुसरा क्षण हसवून जाईल
या जीवनरुपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण
जगण्याची कला शिकवून जाईल....!
  हा सेशन रावसाहेब भोपळे आणि सरोदे सर यांनी घेतला यावेळी उपस्तिथ होते , प्रा. ऋषिकेश औताडे, प्रा. प्रवीण गायकर, प्रा. अमोल सावंत.

Comments

Popular posts from this blog

क्षमा

सहज जीवन कसे जगावे

माणसाला माणूस जोडत गेलं कि माणूसकीच सुंदर नातं तयार होतं.....