सहज जीवन कसे जगावे
4) आजचा सहज विचार ... डॉ. निलेश सोनुने
सहज जीवन जगताना आपण फक्त चारच गोष्टीं लक्षात ठेवाव्या त्या म्हणजे
1. व्यसन
2. फॅमिली
3.पैसा
4. मित्र
पहिली गोष्ट म्हणजे व्यसन.. व्यसन म्हणजे आज हे अशी गोष्ट की त्याच्यामूळं आपल्या जीवनाचं सगळं नुकसान होऊन जातं आणि एकदा जर आपल्यला व्यसन हे लागलं तर मग त्यावर कंट्रोल करणं खूप अवघड असतं. बरेच मुलं हे घरी सांगता कि कॉलेज ला चाललो किंवा हॉस्टेल राहणारी मुलं कॉलेज ला न जाता हॉटेल ला जाऊन सिगारेट , दारू पित बसतात .... यामुळे त्यांचे जीवन कुठे चालले हे त्यांना पण माहीत नसतं.
या वेळी सर बोलले कि जी व्यक्ती कुठल्याही प्रकारच व्यसन करत नाही ती जीवनात 50% यशस्वी झाली सध्यच्या युगात.....
दुसरी गोष्ट म्हणजे फॅमिली, सध्याचं जे जीवन जगतो आपण त्यात खूप स्पर्धा आहे, टेंशन प्रत्येकाला येते, वेगवेगळ्या प्रकारे येते. जो युवा आहे , या मागच्या पाच वर्षात आत्महत्या जास्त युवा लोकांनी केल्या आहे, जर बघितला तर विद्यार्थ्या मध्ये फाशी घेण हा प्रकार जास्त आहे . फाशी का घ्यावी, ठीक ये तुम्ही फाशी घेतली एखाद्याला टेंशन आलं यो नाही सहन करू शकला त्याने फाशी घेतली पण नंतर काय होणार प्रॉब्लेम संपत नाही तुम्ही आहे तुम्हाला प्रॉब्लेम आहे ,तुम्ही गेले नंतर येणारी पेढी आहे त्याला प्रॉब्लेम आहे म्हणून मरायचं नसतं.
जे काही प्रॉब्लेम आहे ते तुमचे जवळचे मित्र असतील त्यांच्या सोबत तुम्हीं चर्चा करा त्यावर, जर मित्र नसतील तर तुमचा फॅमिली सोबत करा फॅमिली मध्ये जर तुमचं जमत नसेल तर फॅमिली मध्ये असा एक व्यक्ती असेल उदा. आई किंवा वडील कि त्यांच्यासोबत तुम्ही तुम्ही चर्चा करू शकता, तुम्ही जेवढं त्यांच्यासोबत चर्चा कराल तेवढं तुम्हाला चांगलं वाटेल .....
तिसरी गोष्ट पैसा. पैसा सगळं काही नाही ये दहा हजार कमावणारे पण जीवन जगतात, एक हजार कमावतो तो पण जीवन जगतो पन्नास हजार जो कमावतो तो पण जीवन जगतो, आणि जो लाख कमावतो तो पण जीवन जगतो. पण त्या पैशाचा वापर व्यवस्तित झाला पाहिजे , दुसरी गोष्ट दिवस निघतो तर आपले एम्स आणि ऑब्जेक्टिव आज काय करायचं आपल्याला ते आपण ठरवलं पाहिजे. यशस्वी होण्याचा दर हा 55 ते 75 टक्के च्या मध्यात जे मुलं आहेत, त्यांचा यशस्वी होण्याचा दर जास्त आहे , कारण त्यांच्यात तेवढं टेंशन स्विकरण्याची क्षमता आणि मानसिकता असते..ज्या मुलांना 75-80 टक्के असतात तेच जीवनात यशस्वी होतात असं काही नाही . सर म्हणतात त्यांना क्रिकेट आवडते , त्यांचा हिरो जर म्हणायचं ठरलं तर राहूल द्रविड , सचिन तेंडुलकर नाही कारण बऱ्याच मॅचेस ह्या राहूल द्रविड ने जिंकावल्यात ठीक ये तो जास्त बॉल मध्ये कमी रन काढेल , पण तो शेवट पर्यंत खेळायचा आणि तो सामना पूर्ण काढायचा... तसच आपण आपल्या जीवनाचं राहूल द्रविड व्हायचं ठीक ये कोणाचा स्पीड जास्त असेल , पण ज्याचा स्पीड कमी असेल त्यानं घाबरून जायचं नाही आपल्या पद्धतीने चालत राहायचं , पण आपलं एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह अचिव करायचं , ह्या कार्याला आपले मित्र पण जबाबदार असतात आपण ठरवायाचं आपल्याला कसे मित्र पाहिजे, काही मित्र कामासाठी पण सोबत असतात , काही एकदम संकट आलं तेव्हा पण आपल्या मदतीला येतात, काही फक्त पार्टी कारण्यापूरते सोबत असतात , तर आपले जे प्रॉब्लेम आहे ते आपण ठरवलं पाहिजे की ते आपण कोणाला सांगायचे, जे आपल्या जवळचे मित्र आहे आपल्या फॅमिली नंतर आहे त्यांच्यासोबत चर्चा करा , असं नाही का जे आपल्या पार्टी मध्ये सोबत आहे त्यांच्याच सोबत चर्चा केली पाहिजे त्या मित्राने फक्त आपली पार्टी रंगेल , वेळ वाढेल तुमच्या पार्टी चा काही सोल्युशन भेटणार नाही...
सर जाता जात बोलले त्यांनी विनंती केली की व्यसनापासून दूर रहा , हे खूप गरजेचं आहे या काळात तरी आणि टेंशन बिलकुल घेईचा नाही नापास झाला नापास झाला पुढच्या वेळेस .. काही प्रॉब्लेम नाही ह्याचा अर्थ असा नाही का टेंशन घेयचं त्याचा काही फरक पडत नाही ....


Comments
Post a Comment