Posts

Showing posts from September, 2018

जीवन कसे जगावे ......

Image
  2 .जीवन कसे जगावे ... प्रा. भाऊसाहेब घोरपडे                      आपण जीवन जगत असताना फक्त स्वतःचाच विचार करत असतो, स्वतःचाच स्वार्थ बघत असतो.  ह्या जीवनाला काहीच अर्थ नाही कुठेतरी जीवन जगण्याची कला बदलायला हवी . एखाद्या गरीबाच्या झोपडीत जाऊन बघा एकदिवस मग कळेल जीवन काय असतं ,जीवनात पैसाच सर्वकाही नसतो... जीवन जगत असतं स्वतःबरोबर दुसऱ्याचा पण चांगला विचार करायला हवा , हि सर्व सृष्टी आपलीच आहे हे समजून जीवन जगावं. सगळ्यांच चांगलच होवो असा विचार करून जीवन जगलं पाहिजे . आपल्या पेक्षा मोठ्या च काय लहान व्यक्तींचा पण आदर , सन्मान व त्यांच्या बद्दल प्रेम आणि आपुलकीची भावना ठेवली पाहिजे. एक दिवस हे जीवन जगून बघा , खरंच खूप मोठा आनंद वाटेल. हा सेशन राऊसाहेब भोपळे , डॉ.अजिंक्य रत्नपारखी, सरोदे सर यांनी घेतला .....

आजचा सहज विचार

Image
आजचा सहज विचार..... १९ सप्टेंबर, २०१८: 1. बह्यारुपापेक्षा अंतररूप महत्वाचे.....प्रा. ऋषिकेश औताडे. माणसाने केवळ आपल्या बाह्यरूपावर लक्ष न देता आपल्या अंतर मनावर लक्ष  दिले  पाहिजे. याचेच एक उदाहरण म्हणजे पेन्सिलचे शिसे. सगळ्या पेन्सिलचे शिसे एकच असते फक्त बाहेरून त्याचे आवरण बदलते , रंग बदलतो , अणि मग कंपनी बदलते . पण तिचं काम सगळीकडे सारखेच असते , याचाच अर्थ म्हणजे आपण  बाहेरून कितीही बदललो , पण आपलं अंतररूप  तेच असतं                        बाहेरचे  रूप घडवण्यापेक्षा अंतररूप घड़वा बाह्यरूप आपोआपच घडेल. श्री. गोकुळदास खंडागळे व डॉ. कु. अजिंक्य रत्नपारखी यांनी सहज योगा सेशन घेतला.....