माणसाला माणूस जोडत गेलं कि माणूसकीच सुंदर नातं तयार होतं.....
5) माणसाला माणूस जोडत गेलं कि माणूसकीच सुंदर नातं तयार होतं.... कु.आदित्य जोंधळे
आजच्या या काळात माणसाने माणूसकी विसरली, कोणत्या व्यक्ती सोबत कसं वागावं, आपल्या पेक्षा वयाने मोठया असलेल्या व्यक्ती सोबत कसं बोलावं याचा कुठे तरी विचार केला पाहिजे।
आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर आपली ओळख हि ठरवली जाते. जीवनामध्ये पैसा, मार्क्स हेच सर्व काही नसतं. पैसा हा प्रत्येक वेळेस आपल्या सोबत राहील याचा काही भरोसा नाही, उदा. जेव्हा आपण मरतो तेव्हा पैसा आपल्या सोबत येत नाही. मार्क्स हे आपली गुणवत्ता ठरवतात, ज्ञान नाही.
ज्ञान नाही ,तर पैसा नाही ,आणि पैसा नाही तर प्रगती नाही।
आपल्या पेक्षा मोठी किंवा लहान असलेल्या व्यक्तीला मान, सन्मान दिला पाहिजे. त्यांच्या सोबत आपली भाषा, व्यक्तिमत्व नीट ठेवले पाहिजे. अभ्यासाबरोबर आपल्याला बाहेरचं व्यावहारिक ज्ञान पण असलं पाहिजे। समाजात कोणत्या व्यक्ती सोबत कसं वागावं , कसं आपलं नातं वाढेल या गोष्टींकडे लक्ष द्या. आपण मेल्यावर आपल्याला लोकांनी आपल्या माणूसकी, व्यक्तित्वावरून लक्षात ठेवलं पाहिजे, पैसावरून नाही ....
कोणत्याही व्यक्ती सोबत कोणतही नातं जोडा मग ते भाऊ बहिणीचं असू, मित्र मित्राचं असू, मित्र मैत्रिणीच असू, कोणतही असू..... फक्त स्वाभिमानाने, मनापासून, आणि खरे ठेवा।
जेव्हा हि सगळे नाते जोडत जातील एक माणूसकीच सुंदर नातं तयार होईल....
Beautiful and chaan
ReplyDelete